ताज्या घडामोडी

अनिल दादा यांनच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन.

विजेता महिलांना मिळणार पैठणी साडी सह इतर आकर्षक भेटवस्तू.

 

*फ्रिज, टीव्ही,शिलाई मशीनसह विजेत्या महिलांना मिळणार पैठणी साडी; सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटावस्तु!

बीड प्रतिनिधी- बीडच्या संस्कृतीक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात आपले सर्वोपरी योगदान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली बीड शहरातील महिला-भगिनींच्या अंगी असलेल्या कलागुणांना दर्जेदार व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायं 6.00 वाजता रामकृष्ण लॉन्स बीड येथे अमोल जाधव यांच्या वतीने भव्य दिव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अवघ्या महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊजी किरण पाटील उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्या महिलेस फ्रिज, द्वितीय क्रमांक प्राप्त दोन महिलांना प्रत्येकी 1 एलसीडी टीव्ही असे दोन एलसीडी टीव्ही, तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या तीन महिलांना प्रत्येकी 1 शिलाई मशीन अशा तीन शिलाई मशीन व त्यानंतर पुढील 21 विजेत्या महिलांना प्रत्येक 1 पैठणी अशा 21 पैठणी साडी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत. याबरोबरच होम मिनिस्टर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला संसार उपयोगी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन स्वतः महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊजी किरण पाटील करणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीडमधील महिला-भगिनींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड बीड येथे येऊन आपल्या नाव नोंदणी करावी अथवा योगेश सारूक : ९१३२७३७४७५, अक्षय जगताप : ९७३०३७२२२२, नवनाथ बोबडे : ७०३०५६२५९०, दत्ता ताटे : ९५९५४३४४०५, लक्ष्मीकांत दोडके : ९९२२८३९७५३यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन नाव नोंदणी करावी.*

बीडमधील महिला-भगिनीं जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे- अनिलदादा जगताप*बीड मधील महिला-भगिनींच्या अंगी सुप्त अवस्थेत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता माझे सहकारी अमोल जाधव यांच्या माध्यमातून होममिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे दि. 5 ऑक्टोबर रोजी रामकृष्ण लॉन्स बीड येथे सायं 6.00 वाजता भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. फ्रिज, एलसीडी टीव्ही, शिलाई मशीन, पैठणी साडी तसेच संसार उपयोगी असणाऱ्या भेटवस्तू देखील सहभागी महिलां-भगिनींना देण्यात येणार आहे. अवघ्या महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊजी किरण पाटील हे स्वतः उपस्थित राहणार असून पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ते स्वतः करणार आहेत. रोजच्या दैनंदिन व्यापातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढून बीड शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button