बीड रेल्वे स्टेशनला डॉ.आंबेडकरांच्या नावाचा फलक पोलिसांनी काढला,आंबेडकरी जनता आक्रमक
पोलिसांनी बॅनर काढल्याने भीमसैनिक थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात

बीड ग्रामीण पोलिसांनी जानिवपूर्वक डॉ.आंबेडकरांचे बॅनर, निळा झेंडा काढला व गुन्हा दखल करण्यात आला. त्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रशांत वासनिक.
वीर (प्रतिनिधी) बीड रेल्वे स्थानकाला दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक आंबेडकरी जनता भीमसैनिकांनी लावला होता, डॉक्टर आंबेडकर यांनी भारत देशाला संविधाना सारखा अनमोल दागिना देऊन देशाची मान उंचावली होती, पीडीत , शोषित ,वंचितांना त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवून भारत देशाला अनमोल संदेश दिला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तमाम आंबेडकर जयंती यांची मागणी होती की बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी याना निवेदन दिले होते. बीड शहराजवळील रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फलक दोन दिवसापूर्वी लावण्यात आला होता, परंतु रात्री बीड ग्रामीण पोलिसांनी रात्री तो फलक काढून रेल्वे स्थानकावर लावलेल्या निळा झेंडा देखील काढण्यात आला, ही बातमी आंबेडकरी जनतेला समजताच आक्रमक भूमिका घेत पोलीसावर रोष व्यक्त करत थेट पोलीस बीड अधीक्षक कार्यालय येथे जमा झाले व बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना बॅनर झेंडे काढा असा दबाव टाकणाऱ्या लोकप्रतिनिधींची माहिती काढावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.