ज्ञानराधा मल्टीस्टेट चे होणार “फॉरेन्सिक”ऑडिट !
सुरेश कुटे,अर्चना कुटेणी केलेले कुटाणे समोर येणार

वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्ञानराधा,तिरूमला द कुटे ग्रुपने नावलौकिक कमावले होते, परंतु ज्ञानराधा मल्टीस्टेटने ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे अमिष दाखवत ठेवीदारांची फसवणूक केल्याने बीड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, संचालक यशवंत कुलकर्णी सह आदी कोठडीत आहेत.या मल्टीस्टेटच्या सर्व व्यवहारांचे फॉरन्सिक ऑडिट केले जाणार असल्याची चर्चा सुरू असून यासाठी आर्थिक गुन्हे शाखा शासनाच्या यादीवरील सनदी लेखापालांकडून दरपत्रक मागविणार आहे. या ऑडिट मधून कशी हेराफेरी करुन ठेवीदारांची फसवणूक केली हे उघड होणार आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटकडून झालेल्या फसवणूक प्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरुन जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ४३ गुन्हे नोंद झालेले आहेत. पोलिसांनी सुरेश कुटे, संचालक आशिष पाटोदकर यांना अटक केली. त्यानंतर आतापर्यंत ४ कर्मचारी, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी यांना अटक केलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, एकूण ५२ शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये १ लाख ६५ हजार ८७२ जणांच्या मुदत ठेवी आहेत. तर, २ लाख ६ हजार ६९७ जण बचत खातेदार आहेत. दोन्हींचे मिळून या पतसंस्थेत ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख ७२ हजार ६३३ रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपासात ज्ञानराधाच्या मुख्य शाखेतून सर्व्हरचे व सॉफ्टवेअरचे काम पाहणाऱ्यांकडून मूळ हार्डडिस्क जप्त केल्या आहेत. या हार्ड डिस्कमधील डेटा तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविला आहे. यामध्ये शासनाच्या यादीवरील मान्यताप्राप्त सनदी लेखापालांची नेमणूक करुन ऑडिट होणार आहे. या ऑडिटमधून ज्ञानराधा पतसंस्थेतील व्यवहाराचीसर्व माहिती समोर येवू शकते, सुरेश कुटे अर्चना कुटे यांनी केलेले कुटाणे नक्कीच समोर येणार आहेत व त्यामुळे तपासाला वेग येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लवकरच ही प्रक्रिया केली जाणार आहे. परंतु ठेवीदारांमधून मात्र केवळ हक्काचे पैसे मिळणार की नाही? यामुळे लाखो ठेवीदारांचे चिंतेत आहेत.