
आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केल्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. मराठा समाजाला समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी संघर्ष लढा उभारला. महाराष्ट्र राज्याची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड संस्थान येथे ऐतिहासिक दसरा मेळावा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने घेणार आहे अशी घोषणा करत दि.२९ सप्टेंबर रोजी नारायणगड च्या पवित्र भूमीत मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्यासह सर्व जाती धर्माचे समाज बांधव समन्वय,व हजारो युवक यांच्या उपस्थितीत मेळाव्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हेदेखील यंदाच्या वर्षी दसरा मेळावा पवित्र भूमीत नारायणगड घेणार आहेत. अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर ह्या दसरा मेळाव्याचे आयोजन संदर्भात मठाधिपती महंतशिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव समन्वय, विश्वस्त मंडळ, आणि हजारो युवक यांच्या उपस्थितीत मेळाव्याच्या दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक घेत यावेळी मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले की,हा नारायण गड सर्व जाती धर्माचा असून अठरापगड जाती धर्माला धरून चालणार आहे. यामुळे या गडावर सर्वांचे प्रेम श्रद्धा आणि भावना आहे. हा दसरा मेळावा हा ऐतिहासिक असून सर्वाच्या मनात आनंद निर्माण होणारा असावा. यासाठी सर्वांनी मिळून हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. फक्त आशिर्वाद घेण्यासाठी हा दसरा मेळावा घेतठरावा आणि प्रत्येकाच्या मनात आनंदाची गुढी उभारावी जावी अशीशुभेच्छा दिल्या.न भुतो न भविष्यात बैठक मेळावा होवो अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर समाज बांधवांनी आपापल्या सुचना,मते दिल्या.यावेळी झालेल्या बैठकीत जागेचे ठिकाण अन् स्टेज मंडप चे नियोजन उरून पुढील दहा ते बारा दिवसांत म्हणजे दसराच्या दिवसांपर्यंत दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत सर्व समाज बांधवांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी नियोजन आयोजन संदर्भात जनजागृती करावी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हातभार लावण्यासाठी सर्व जाती धर्माच्या वती ने सढळ हाताने मदत घोषित करण्यात आली.अनेक दानशूरांनी मेळावा घेण्यासाठी हातभार लावला.श्री क्षेत्र नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखो सर्व जाती धर्माचे समाज बांधव एकत्र येणार आहेत तर कोणाचीही गैरसोय होणार नाही यासाठी गडावरकसे नियोजन करावे लागेल याबाबतीत सुचना देण्यात आल्या. पाणी व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, आरोग्य संदर्भात गैरसोय टाळण्यासाठी श्रीक्षेत्र नारायनगडावर नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम सुद्धा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सवचि लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भातली भूमिका ते या मेळाव्यात स्पष्ट करतील असे सांगितले जात तरी या दसरा मेळाव्याच्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अत्ते आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या दसरा मेळाव्याची नियोजन करण्यासाठी मराठा समाज समिती बैठका घेत असून जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होणार आहे, मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.