
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड, मोंढा भागातील रहिवासी बाळासाहेब पवार वय ३५ वर्ष हे मागील काही महिन्यापासून आजारी असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णांमध्ये उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले. ही दुःखद वार्ता बीड शहरामध्ये समजतात मित्र परवार, नातेवाईक यांना धक्का बसला.बाळासाहेब पवार हे बीड शहरात सर्वतो परिचित होते, त्यांचा मित्रपरिवार मोठा होता, एक दिलदार व्यक्तिमत्व, गोरगरिबांना मदत करणारा, गोरगरिबांना मदतीसाठी धावून जाणारा व मनमिळाऊ मित्र म्हणून त्यांची ओळख बीड शहरात होती. बाळासाहेब पवार हे “युवा शक्ती”सामाजिक प्रतिष्ठान या नावाने सामाजिक कार्य करत होते त्यामुळे त्यांचे बीड जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार होता.बाळासाहेब पवार यांचे कुटुंब मोठे असून आई-वडील, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे. त्यांच्य अचानक जाण्याने मित्रपरिवार व नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उद्या दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोंढा येथील समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.