बीड नगरपालिकेत सामाजिक कार्यकर्त्यांनी खेळल्या गोट्या !
नगरपालिका प्रशासन,मुख्याधिकारी बीड यांचे शहराकडे दुर्लक्ष

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहर मागील काही महिन्यापासून विविध समस्यांनी ग्रासले असून बीड नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासन यांच्या मनमानी कारभार दुर्लक्षमुळे रहिवाशांना यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शरद मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे, मागील काही दिवसात झालेल्या संतधार पावसामुळे बीड शहराला आलेले तलावाचे स्वरूप, जागोजागी कचऱ्याची ढीग,गल्लीबोळ्या तुंबलेल्या नाल्या, मोकाट कुत्र्याचा झुंड, मुख्य रस्त्यावर मोकाट जनावराचा भरलेला बाजार, शहरातील बऱ्याच गल्ल्या गोळ्या मधील विद्युत पददिवे बंद,पावसाळा असून देखील पिण्याचे पाणी १५ ते २० दिवसाला,घाणीच्या साम्राज्यामुळे डेंगू सारख्या आजार वाढत आहे, कित्येक महिन्यापासून मलेरिया विभागाकडून धूर फवारणी नाही, नाली मध्ये टाकण्यात येणारे लिक्विड नाही त्यामुळे बीड शहर ते नागरिकांना विविध रोगाचा सामना करावा लागत आहे.बीड नगरपरिषद प्रशासन गोट्या खेळतंय का?? बीड शहरातील अस्वच्छता, गटारीचे पाणी रस्त्यावर, रस्त्यावरील खड्डे, मोकाट जनावरे निष्क्रिय नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ नगरपरिषद मुख्याधिकारी कॅबिन समोर “गोट्या खेळा” आंदोलन” करण्यात आले.बीड शहरातील मान्सुनपुर्व स्वच्छता कामे कागदोपत्रीच करण्यात आली असुन शहरातील शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर त्यामुळे होणारे अपघात डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.३० सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांच्या दालनासमोर ” गटारीचे पाणी रस्त्यावर,’ रस्त्यावर खड्डे ‘ नगरपरिषद प्रशासन काय करतंय गोट्या खेळतंय ” अशी घोषणाबाजी करत गोट्या खेळुन लक्ष्यवेधी ” गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले.नीता अधारे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार, बप्पासाहेब पवार ,रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष बीड, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सादेक सय्यद आदि सहभागी होते.