नारायण गडावरील दसरा मेळाव्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन
जरांगे पाटलाचा मेळावा ऐतिहासिक होणार : अनिल दादा जगताप

श्री क्षेत्र नगद नारायणगड येथील दसरामेळाव्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन .
वीर( प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असणाऱ्या धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गड संस्थान पौंडुळ ता. शिरूर (का.) जि. बीड या ठिकाणी प्रति वर्षाप्रमाणे या ही वर्षी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता पारंपारीक दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गरूवर्य ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व संघर्ष योध्दा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. संबंध महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातुन भक्तगण या मेळाव्यास येणार आहेत. यासाठीच्या रीतसर परवानगीचे निवेदन आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना दिले व नारायण गड येथे पारंपारीक दसरा मेळावा साजरा करण्यास परवानगी देवुन सहकार्य करावे अशी विनंती केली. याप्रसंगी श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या विश्वस्तांपैकी माझ्यासोबत बळीराम गवते, सी.ए.जाधव आणि हनुमान मुळीक उपस्थित होते.