
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली 35 वी बीड जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-2024 दिनांक 26/09/2024 ते 30/09/2024 दरम्यान कवायत मैदान,पोलीस मुख्यालय,बीड येथे आयोजीत करण्यात आल्या होत्या.या क्रिडा स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 30/09/2024 रोजी कवायत मैदान,पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे शुभहस्ते पार पडला. सदर क्रिडा स्पर्धेमध्ये बीड उपविभाग,अंबाजोगई उपविभाग,आष्टी उपविभाग व पोलीस मुख्यालय असे चार संघ व 82 खेळाडु सहभागी झाले होते. त्यामध्ये सर्वाधीक प्रथम क्रमांकासह बीड मुख्यालयाचा संघ विजयी झाला आहे. पुरुष गटातुन पो.अं.1956 युवराज पवार हे सर्वोत्कृष्ठ पुरुष खेळाडु तर महीला गटातुन म.पो.अं. 2228 अर्चना आघाव ह्या 35 व्या बीड जिल्हा क्रिडा स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ठ महीला खेळाडु ठरल्या आहेत. समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले की”पोलीसांवर असलेला प्रचंड कामाचा ताण याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम, त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खेळात रुची वाढवुन नियमीत व्यायाम करुन ताण-तणावाचे व्यवस्थापन करावे. तसेच पोलीस क्रिडा प्रकारात परिक्षेत्रीय,राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर बीड जिल्हा पोलीस दलाचा नाव लौकीक करावा “तसेच क्रिडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बीड विश्वांबर गोल्डे यांनी प्रास्ताविक सादर केले.बालगोपाळांच्या स्पर्धा तसेच पोलीस व पत्रकार यांच्यातील रस्सीखेच सामन्याने समारोप कार्यक्रमात रंगत आणली.सदर क्रिडा स्पर्धा यशस्वी समारोप व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बीड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे,राखीव पोलीस निरीक्षक श्री.पांडुरंग दलाई, पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा., श्री. शितलकुमार बल्लाळ बीड शहर, श्री. मारुती खेडकर शिवाजीनगर बीड, सपोनि श्री.महादेव ढाकणे, भास्कर नवले, सचिन इंगळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री.बोंद्रे,तसेच पोलीस अंमलदार, पत्रकार बांधव व पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.समारोप व बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई यांनी आभार व्यक्त केले.