बीड सी.एस.पदी डॉ.अशोक थोरात यांची नियुक्ती

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्हा रुग्णालय चिकित्सक पदी(सी.एस.) डॉ.अशोक थोरात यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ.थोरात थोरात यांनी याआधीही बीड जिल्हा रुग्णालय येथे पदभर होता,त्यांनी बीड नंतर नाशिक येथे सी.एस.म्हणून बदली झाली होती सी.एस.बडे यांनी जिल्हा रुग्णालयातील सीएस पदी नियुक्ती झाल्यापासून जिल्हा रुग्णालयातील कारभार ढेपाळला होता, सी एस बडे यांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यावर वचक राहिला नसल्याने डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यात दिरंगाई करत होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या म्हणून बीड जिल्ह्यात रुग्णालयाचा अनुभव असलेले डॉ.थोरात, त्यांच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्हा रुग्णालयात स्वतः लक्ष घालून रुग्णांना उपचार देण्याचे काम केले होते त्यामुळे त्यांना बीड जिल्हा सी.एस.पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल डॉक्टर अशोक थोरात यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.