लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह !
लक्ष्मण हाकेनी मद्यप्राशन केल्याचा आरोप होता

वीर(प्रतिनिधी)ओबीसी नेते,आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा आरोप काल सायंकाळी पुणे येथे करण्यात आला होता.यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. पण आता लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल पुढे आला असून, त्यात हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा कथितपणे झिंगत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी मराठा आरक्षण समर्थक तरुणांनी हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी हाके यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून दमदाटी केल्याचाही आरोप आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. सोमवारी रात्री पुण्यात ही घटना घडली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या हाके यांनी केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला.या संबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरुण लक्ष्मण हाके यांना धरून घेऊन जाताना दिसून येत आहेत. यावेळी काहीजण त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचीही मागणी करत हाके समोर घोषणाबाजी करण्यात आली होती.या घटनेमुळे लक्ष्मण हाके यांच्या सार्वजनिक ठिकाणावरील व्यवहारावर टीका केली जात असतानाच आता त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपल्यावरील कथित हल्ल्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह आल्याने विरोधक व आंदोलक यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे या चाचणीवरून स्पष्ट झाले आहे.