लिंबागणेश पोलीस चौकी समोरील दुकानं चोरट्यांनी फोडली.
पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून चोरट्याने घातला होता, त्यातच रात्रीचे ड्रोन जिल्हाभर दिसत असल्याने नागरिकास संभ्रमाचे,भीतीचे वातावरण झाले होते. त्या ड्रोनचा उघडा आणखी देखील बीड जिल्हा पोलिस आणि केला नसल्याने बीड जिल्ह्यातील नागरिक विशेष करून खेडेगावातील ग्रामस्थत भीतीचे वातावरण आहे.मध्यंतरी काळामध्ये ग्रामस्थांनीच चोरट्याने पकडून चोप देत पोलिसाच्या ताब्यात दिले होते.काल मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील लिंबागणेश येथे पोलीस चौकीसमोरील दुकाने चोरट्याने पत्रा कापून, संकेत किराणा, मंगलमूर्ती मोबाईल शोपी, गजानन किराणा हे तीन दुकान फोडून दुकानातील समान पळवले हा प्रकार सकाळी उघडकीस आला. लिंबागणेश मतील पोलीस चौकीच्या समोरच दुकान चोरट्याने फोडल्याने पोलीस चौकीत थांबत नाहीत का? असा प्रश्न पडला असून नेकणुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.चोरट्यांचे भीतीने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी मागणी लिंबागणेश ग्रामस्थ करत आहेत.