
आनंद वीर(प्रतिनिधी) कमरेला गावठी कट्टा(पिस्टल) लावून फिरणाऱ्याय स्था.गु.शा.बीड ने पकडुन एक गावठी गट्टा मुद्येमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक,बीड यांनी अवैध शस्त्र बाळगणारे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांनी वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणारे विरुध्द कारवाई करण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदशकन केले. त्यावरुन दिनांक 01/10/2024 रोजी स्थागुशा येथील पोह/अशोक दुबाले, यांना गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे शिव सुनिल खोसे रा. माळीवेस याचेकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली, सदर खबर पो.नि. श्री.उस्मान शेख, स्थागुशा बीड यांना कळवुन त्यांनी पोउपनि मुरकुटे यांचे पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोउपनि मुरकुटे यांनी पथकासह सदर इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली , जालना रोडवरील मिलन बिअरबार समोर असल्याची माहिती मिळाली तेव्हा सापळा लावुन इसम नामे शिव सुनिल खोसे रा. यास शिताफीते पकडुन त्याचेजवळ अवैधरित्या एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राऊंडसह मिळुन आला आहे. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द सरकार तर्फे पोह/मनोज वाघ यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे.बीड ग्रामीण येथे कलम 3,25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. आरोपीचे ताब्यातुन एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण किंमती 41,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, सफौ/तुळशिराम जगताप,पोह/अशोक दुबाले, पोह/कैलास ठोंबरे, मनोज वाघ, राहुल शिंदे, पोना/विकास वाघमारे, पोशि/नारायण कोरडे, यांनी केली आहे.