डॉ. थोरात यांची आचारसंहितेपूर्वी बीड जिल्हा बाहेर बदलीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार
पांडुरंग सुगडे (प्रतिनिधि)

डॉ.अशोक थोरात यांची आचारसंहितेपूर्वी बीड जिल्हा बाहेर बदलीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी शासकीय सेवेत असताना केज तालुक्यातील तांबवा जिल्हा परिषद गटातुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना राजकीय सहभाग असल्याची लेखी तक्रार तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री बीड यांनी लेखी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना केली होती. त्यांचा पुर्व इतिहास पाहता त्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तसेच आदर्श आचारसंहिता भंग करणारी असल्याने आगामी आचारसंहितेपुर्वी त्यांची तात्काळ बीड जिल्हा बाहेर बदली करून त्यांच्या विरूद्ध नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, निवडणूक निर्णय अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई आणि कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना केली असुन ठोस कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
सारख्या महत्वाच्या पदावर असताना राजकीय सहभाग असल्याचा पुराव्यानिशी लेखी तक्रार करत डॉ.अशोक थोरात यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तसेच आदर्श आचारसंहिता भंग करणारी असल्याने आचारसंहितेपुर्वी त्यांची तात्काळ बीड जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी असे म्हटले होते. आता पालकमंत्री बीड धनंजय मुंडे सत्तेत असताना बीड जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ.अशोक थोरात यांची नियुक्ती नेमकी कोणती तडजोड करून करण्यात आली असा सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी विचारला आहे.