एटीएम मधून पैसे चोरण्याचा नवीन फंडा !
एटीएम मशीनला पट्टी लावल्याने पैसे अडकलेल्या अनेकांच्या तक्रारी

आनंद वीर(प्रतिनिधी) चोरटे कधी कशी चोरी करतील याचा काही नेम नाही, वेगवेगळ्या शक्कल वापरून चोरटे चोऱ्या करतात. छोट्याने नवा उद्योग सुरू केला. बीड शहरातील एका एटीएम मशीन ला पट्टी लावल्याने पैसे बाहेर येत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना चुना लागत असल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी नवीन फंडा वापरत असल्याचे यातून दिसत आहे.विशेष म्हणजे पट्टी लावल्याने पैसे काढताना त्यात पैसे अडकतात व नंतर ते छोटे येऊन कशातरी पद्धतीने ते पैसे घेऊन जातात हा विषय गेल्या सात ते आठ दिवसापासून सुरू आहे विशेष म्हणजे तेथील पट्टीला फेविकॉल सुद्धा लावण्यात आलेला आहे सकाळपासून दुपारपर्यंत एकाला दहा दुसऱ्याला दहा हजार तसेच तिसऱ्याचे तीन हजार रुपये असे इतर 23 हजार रुपयाला तिघ जणाला चुना लागला आहे विशेष म्हणजे असे सकाळपासून अजून किती शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले होते ज्याचे पैसे गेले ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले होते.बीड येथील स्वराज्य नगर च्या शेजारी एटीएम मध्ये चक्क पट्टी लावून नागरिकांना घंटा घालण्याचा धंदा सुरू आहे सकाळपासून बरेच नागरिकांचे पैसे चुना लागला आहे एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासून एस पी साहेबांनी कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.दोन नागरिकांचे दहा दहा हजार तर एका नागरिकांचे तीन हजार रुपयाला लागला चुना सकाळपासून असे किती नागरिकांचे पैसे लागला चुना तपासून कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.