परळी सरपंच हत्या प्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर
बबन गित्तेसह इतर आरोपी अद्यापही फरार.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड सह राज्यभरात गाजलेल्या परळीतील मरगळवाडी येथील सरपंच बापूराव आंधळे खून प्रकरणातील ६ आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला.याच खून प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह आणखी पाच जनावर खुनाचा गुन्हा दखल असल्याने फरारच आहेत.त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथके तयार केलेली असली तरी ते अद्याप पोलिसांना सापडले नाही.परळी शहर पोलिस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न असे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते.याचा तपास ७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.यात खुनाच्या गुन्ह्यात सहा आरोपी असून त्यांचा जामीन झाला आहे. आणखी पाच आरोपी फरार आहेत.तसेच खुनाच्या प्रयलाच्या गुन्ह्यात सहा पथके आरोपी असून पाच अटकेत आहेत.वाल्मीक कराड याचा सहभाग आढळला नाही. या दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.या प्रकरणात फिर्यादी ग्यानबा उर्फ गोट्या गिते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत म्हटले होते की, २९ जून रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी महादेव गिते यांच्या घरासमोर बापूराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावून घेतले.त्यानंतर आरोपी शशिकांत उर्फ बबन गिते व इतरांनी कट रचून बापूराव आंधळे यांचा गोळ्या झाडून खून केला व फिर्यादीवरसुद्धा गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीविरुद्ध कलम ३०२, ३०७, १२०खून व खुनाच्या गुन्ह्यांचा तपास आमच्या शाखेकडे आहे.दोन्ही गुन्ह्यांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. जे फरार आरोपी आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक करू,तपासासाठी तीन पथके नियुक्त केलेली आहेत.या गुन्ह्यात ६ आरोपींना अटक करण्यात आली होती व त्यांचे जामीन अर्ज सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी फेटाळले होते.मात्र उच्च न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की,सरकार पक्षातर्फे आरोपीविरुद्ध केलेले आरोप अविश्वसनीय आहेत. अर्जदार आरोपी है प्रत्यक्ष मारेकरी नाहीत.केवळ राजकीय दबाव म्हणून गुन्हा दखल झाला.गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून आरोपी हे जामिनावर सोडण्यास पात्र आहेत,असा निकाल दिला.