शहरातील बार्शी रोडवरील लॉजवर राडा !
लॉज च्या तपासणी करून कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश द्यावेत,सत्य समोर येईल.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये हॉटेल, लॉजिंग च्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु या लॉजचा वापर फक्त जोडप्याला भेटण्याची ठिकाणे झाल्याचे दिसत आहे. कारण बीड जिल्ह्यात एकही पर्यटन स्थळ नसल्याने फक्त जोडप्यांना भेटण्यासाठीच याचा वापर होतो का? काही लॉज वाले तर लॉज मध्ये येणाऱ्या मुला, मुलींची, महिलांची नोंद रजिस्टर करत नसल्याचे दिसून आले आले. चार दिवसापूविच बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील एका लॉजवर असाच प्रकार घडला होता,त्यावेळी नेकनुर पोलिसांनी एक मुलगा व एक मुलीला ताब्यात घेऊन चौकशी करून मुलाला ताब्यात घेतले होते. त्यावेळी देखील त्या लोजच्या बाहेर असाच जमा जमा झाला होता. आज दिनाक ४ऑक्टोबर रोजी सकाळी बार्शी रोडवरील एका लॉजवर दोन मुलं,दोन मुली सोबत थांबण्यासाठी बीडमधील हॉटेल चॉईस केले, मात्र हा सगळा खेळच उघडा पडला, त्या मुलींना लॉज मध्ये जाताना काही तरुणांनी पाहिले असता त्याची माहिती बीड शहरभर पसरल्याने एक मोठा जमावाने त्या हॉटेलला काही जणांनी घेरले, जमावाने हॉटेलच्या आत जाण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड शहर पोलिस तत्काळ हॉटेल मध्ये दाखल झाली, यावेळी हॉटेल मधील चौघांना बाहेर काढून शहर पोलीस ठाण्यात नेत असताना अचानक जमावाने पोलिसाच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मध्ये सापडलेल्या त्या चौघांना बीड शहर ठाण्यात आणण्यात आले, या प्रकरणी चौकशी करून, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणली. बीड पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालून सर्वच लॉजवर अचानक धाड मारून “नंगानाच” बंद करावा त्या लॉजची रजिस्टर व सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासावे तरच सत्य समोर येईल, बेकायदेशीर लॉजिंगचा व्यवसाय करणाऱ्यांना जर बसेल.