अल्पवयीन मुलीला लॉज दिल्याने”गोल्डन चॉईस”चा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात !
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवरील “गोल्डन चॉईस”हॉटेल,लॉज मध्ये बऱ्याच दिवसापासून बिनधास्त “नंगानाच” सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.शहरातील हॉटेल,लॉज फक्त जोडप्यांना भेटण्याचे ठिकाण झाले होते.काल दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळी दोन वेगवेगळ्या जातीचे जोडपे या लॉज मध्ये गेल्याची अफवा बीड शहरात पसरली त्यामुळे एका धर्मातील लोक या लॉजच्या समोर जमा होऊन लॉज मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत गोंधळ घालत राडा केला होता.पोलिसांनी वेळेवर आल्याने पुढील अनर्थ टाळला,त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात चोकशीसाठी घेऊन जात असताना संताप जमावाने त्या जोडप्यावर व पोलिसाच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाची परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जमावातील काहिवर पोलिसांनी गुन्हा दखल केला.त्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वय बाबद अधिक तपासणी,पुरावा पाहिला असता एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आल्याने त्या मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन जोडप्यांना मुलीला रूम दिल्या प्रकरणी हॉटेल “गोल्डन चॉईस” च्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.बीड शहरातील काही “लॉज वाल्यांनी लाजा सोडल्या”अशी चर्चा नागरिक करत आहेत. त्या हॉटेल, लॉज मधिल सीसीटीव्ही कॅमेरे रजिस्टर तपासली जाणार आहेत. त्यातून सत्य बाहेर येईल.अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ करत आहेत.