ताज्या घडामोडी

बिर्याणी हाऊसवर पोलिसांच्या कारवाया !

बिर्याणी हाऊस मध्येच दारू विक्री,चार लाखाचा मुद्देमाल जप्त.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे अविनाश बारगळ यांनी घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यावर कारवायात वाढ झाली आहे.बीड शहर व जिल्ह्यात चालु असलेले बिर्याणी हाऊस मध्ये अवैधरित्या दारु विक्री तसेच ग्राहकांना अवैधरीत्या दारु पिण्यासाठी बिर्याणी हाऊस चालकांकडुन जागा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याबाबत गोपनिय माहीती बीड पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांनी काल दि.०४/१०/२०२४ रोजी जिल्ह्यातील बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन करवाया करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदारांमार्फत पोलीस ठाणे हद्दीतील ३८ बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन एकुण ४,४३,१५५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणी विनापरवाना अवैध दारु कब्जात बाळगणे, विक्री करणे तसेच विनापरवाना ग्राहकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन गुत्ता चालवणे या कृत्यांसाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकुण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण ३८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु, सहा.पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, श्री. विश्वांबर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई निरज राजगुरु, उपविभागय पोलीस अधिकारी अंबाजोगई अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, मारुती खेडकर, एस.एम जाधव, मजहर सय्यद, बालक कोळी, प्रशांत महाजन, विनोद घोळवे, रामराव पडवळ, संभाजी ढोणे, सपोनि. मधुसुदन घुगे, सोमनाथ नरके, मंगेश साळवे, भार्गव सपकाळ, अमन शिरसट, अनिल खोडेवाड, भाऊसाहेब वाघमोडे, मच्छिद्र शेंडगे, अनमोल केदार, राजकुमार ससाणे व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button