बीड विधानसभा मुलाखतीत आ.संदीप क्षीरसागर गैरहजर !
आ.संदीप क्षीरसागर गैरहजर राहिलेले राजकीय उलट सुलट चर्चा.

आनंद वीर (प्रतिनीधी)बीड विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्वतःशनिवारी पुण्यात बीड जिल्ह्यातील ईच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. बीड जिल्ह्यातून ५७ भावी आमदारांनी मुलाखती देत.निवडून येण्याची क्षमता दाखवित विधानसभेची उमेदवारी आम्हालाच द्या,अशी मागणी शरद पवारांकडे प्रत्येकाने केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही मतदार सांगावं शरद पवार यांचे लक्ष आहे.बीड जिल्ह्यावर पुन्हा एखदा शरद पवारांना वर्चस्व निर्माण करायचे आहे,त्यामुळे ऐनवेळी सहाही मतदार संघातून पवार महायुतीला चारीमुंड्या चित करण्यासाठी तगडाच उमेदवार देणार आहेत.मात्र आ.संदीप क्षीरसागरांच्या गैरहजेरीत पवार गटाच्या मुलाखती झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.बीड जिल्ह्यातील सहाही ईच्छूक उमेदवारांसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत काल पुण्यात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मुलाखतींच्या वेळी बीडचे आ. संदिप क्षीरसागर हे गैरहजार राहिल्याचेही समोर आले. त्यामुळे उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.बीड उषा दराडे,दिलीपगोरे,भागवत तावरे,बी.बी. जाधव,अमर शेख आदीपरळी राजाभाऊ फड, सुदामती गुट्टे,शशिकला बबन गिते, फुलचंद कराड, डॉ. यशवंत देशमुख आदी.त्यातच माजलगावचे मोहन जगताप पवारांना भेटले, माजी.आ. संगिता ठोंबरे,पृथ्वीराज साठे, अंजली घाडगे, सुरेश गालफाडे आदी.बीड विस्थापितांना अनुकूल, भागवत तावरेंनी शरद पवारांसमोर मांडली प्रस्थापितमुक्तीची कल्पनापुणे येथील मार्केट यार्ड येथे शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी बीड विधानसभा मधील सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितली यावेळी भागवत तावरे यांनी प्रभावी अभ्यासू मांडणी करत विस्थापित चेहरा द्या असे आवाहन केले. मतदार संघात शहर ग्रामीण हे समीकरण जुळवताना सामाजिक अभिसरण व सलोखा आपले असल्याचे त्यांनी म्हटले. बीड मधील सर्वाधिक वेळ बोलणारे भागवत तावरे यांनी पक्षिय मुलाखत घेणान्या नेत्यांचे लक्ष केज,आष्टी,महेबूब शेख,प्रा.सुशिला मोराळे, अॅड नरसिंह जाधव,राम खाडे, साहेबराव ट्रेकर,अमोल तरटे,सतिश शिंदे आदी.माजलगाव राधाकृष्ण होके पाटील,गंगाभिषण थावरे,ईश्वर मुंडे,नारायण डक गेवराई पुजा मोरे, आण्णासाहेब राठोड सह इतरांनी मुलाखती दिल्या परंतु बीड चे आमदार संदीप क्षीरसागर मुलाखतीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली होती.