
आनंद वीर(प्रतिनिधी) काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवत नसल्याने अनेक तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपले जीवन संपवले आहे.आज बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बीड जिल्हा परिषद आवारातच आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अर्जुन कवठेकर रा. अंकुश नगर बीड या मराठा तरुणाने मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची एक चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली असून त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत असा उल्लेख केला आहे .बीड शहर पोलिसांनी ती चिट्ठी अधिक चौकशीसाठी घेतली.अर्जुन कवठेकर हे बीड मधील एका खाजगी ट्रॅव्हल्स वर चालक होते. आत्माहत्याची माहिती मिळतात माहिती शहर पोलीसाना मिळाली असता, तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रेत खाली घेऊन बीड जिल्हा रुग्णालयात शुवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहे.