मराठ्याने आत्महत्या थांबवा,अन्यथा काम थांबवेल जरांगे पाटील.
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे जाणीवपूर्वक मराठा आरक्षण देत नाहीत.

आनंद वीर(प्रतिनीधी) जरांगे पाटील यांनी नारायणगड येथे येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्या घेणार असल्याने आज जरांगे पाटील आज बीड येथे आले असता मराठा तरुणांनी आत्महत्या थांबवावे अन्यथा मी काम करणं थांबवेल,मी मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत थांबणार नाही. या तरुणाने आत्महत्या केल्या त्यांच्या घरची परिस्थिती काय असेल किती आक्रोश करत असतील त्यांच्या मुलं पत्नी आई-वडिलांची काय परिस्थिती असेल ते आज उघड्यावर पडले आहेत.हे सरकारला माहित असून देखील मुद्दामून मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.हे सरकार फक्त सत्कार,सभा,बैठका घेण्यात व्यस्त आहे.त्यामुळे आता त्यांना सुट्टी देणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी बोलून दाखवले व या बलिदानाचा मी बदला घेणार व मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या थांबव्याव्यात नाही तर मी काम बंद करेल असे देखील सांगितले.