ताज्या घडामोडी

राष्ट्रीय महामार्गावर पडले भगदाड,अपघातास निमंत्रण.

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच भगदाड

आनंद वीर (दि.०६) बीड तालुक्यातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा येथील हाँटेल कन्नैय्या पासुन २०० मीटर अंतरावर बीडकडे जाणा-या उड्डाणपूल संपतो त्याठिकाणी रस्त्यावर खड्डा नव्हे तर मोठं मोठाली ३ भगदाडे पडली असून रात्री अपरात्री भगदाड लक्षात न आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसुन संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केली आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले .बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले असुन शासकीय नोंदीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान १२० दिवसात १२९ अपघात आणि १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.शिवाय ९८ अपघातात १३० जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.अति वेग बरोबरच रस्त्याची दुरवस्था अपघाताचे कारणपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तसेच वाहनधारकांचा निष्काळजीपणा, ओव्हरटेक करणे,चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे पण त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते जागोजागी रखडलेले अपुर्ण रस्ते व खड्डे पडणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण आहे.

रस्ता सुरक्षा अभियान कागदावरच केवळ फोटोसेशन

प्रशासनाकडून राबविण्यात येणारे “रस्ता सुरक्षा अभियान”कागदावरच असुन रापम, पोलिस प्रशासन, आणि आरटीओ विभाग लाखों रुपये खर्च करून जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटोसेशन करताना दिसुन येते.याचा फारसा फायदा दिसून येत नसल्याने अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button