
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात मागील काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.बीड शहरातील नगर रोड,रहदारीच्या ठिकाणा वरून मोटरसायकल चोरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.नगर रोड वरील तेजस अर्बन बँक समोर अमोल बाबुराव नांदे वय-32 वर्षे रा.नवगन राजुरी बीड हे भाजीपाला विक्री करणाऱ्याची मोटरसायकल चोरीस गेली.यांच्या वडिलांच्या बाबुराव मोराजी नांदे यांच्या नावावर असलेली डीस्कव्हर कंपनीची मोटारसायकल क्र. MH23 AH5127 दिनांक-03/10/2024 रोजी दुपारी 04.00वा, सुमारास तेजस अर्बन को.ऑ.सोसायटी नगर रोड बालेपीर बीड येथे बँकेत पिग्मी चे पैसे काढण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने मोटारसायकलचे हँन्डल लॉक करून बँकेत गेले असता 05.00 वा बँकेतुन पैसे काढुन परत मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी मोटर सायकल दिसली नसल्याने भावास बोलवून घेवुन मोटारसायकलचा आजुबाजुला परीसरात व बीड शहरात शोध घेतला असता मोटर सायकल मिळून आली नसल्याने गाडी लावलेल्या ठिकाणाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असतात एका चोरट्याने मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून मोटरसायकल चोरून नेल्याचे दिसत आहे. दिवसा ढवळ्या,वर्दळीच्या ठिकाणाहून मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात चोरट्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.