ताज्या घडामोडी

अनिल दादाच्या होम मिनिस्टर स्पर्धेत हजारो महिलांना जम्बो पॅकेज !

अनिल दादा यंदा आमदार व्हा!महिला भगिनीची आर्तहाक

 

आनंद वीर(प्रतिनिधी)- तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपल्या कौटुंबिक जबाबदारीवर तत्पर असणाऱ्या महिला भागीनींना एक विरुंगुळा मिळावा या उदात्त हेतूने शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मामा जाधव यांनी काल दि. 5 ऑक्टोबर रोजी बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा आगळा-वेगळा कार्यक्रम वजा स्पर्धा घेतली. या स्पर्धेमध्ये बीड शहर-ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने महिला-भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. अत्यंत देखण्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमात महिला भगिनीं आमच्या दादांचा कार्यक्रमा म्हणजे नो प्रॉब्लेम असं म्हणत धमाल उडवली. गप्पा-गोष्टी, गाणी- उखानी, खेळ, मौज-मज्जा आणि भरपूर मनोरंजन करत लाडक्या बहिणींनी मनमुराद आनंद लुटाला. यादरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला-भगिनीं अनिलदादा यांची भेट घेऊन अनिलदादा यंदा तुम्ही आमदार व्हा, अशी आर्तहाक देत इच्छा व्यक्त करत होत्या. नारीशक्तीचा सन्मान हा संस्कार हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी आम्हा शिवसैनिकांवर बिंबवलेला आहे. याचमुळे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा अशा विविध योजना महिला सबळीकरणासाठी अमलात आणल्या आहेत. आम्ही देखील मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या प्रेरनेतूनच महिला सन्मान व हिताचे कार्यक्रम-उपक्रम राबवत आहोत असे अनिलदादांनी आपल्या मनोगत भाषणात महिला-भगिनींसमोर भावना व्यक्त केल्या व आगामी काळात आपण मोठ्या स्वरूपात महिला भगिनींसाठी अशा आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे वारंवार बीड शिवसेनेच्या वतीने आयोजन करण्यात करणार असल्याचेही अनिलदादा जगताप यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मनोगत भाषणात सर्व महिला भगिनींचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विजेत्या महिलांना फ्रिज, टीव्ही, शिलाई मशीनसह पैठणी साडी देण्यात आली तर सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटावस्तु दिल्या. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारे अवघ्या महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊजी किरण पाटील यांनी या कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले तर ऋषिकेश मोहळे आणि सुमित केंद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुणाचीही गैर सोय न होऊ देता अत्यंत नियोजनबद्ध पार पडलेल्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कार्यक्रमाचे आयोजक अमोल जाधव व त्यांच्या मित्रमंडळाने केले होते. याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी अमोल मामा जाधव मित्रमंडळाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, ऍडव्ह संगीता चव्हाण, शेषेराव जगताप नगराध्यक्ष वडवणी यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी- लोकप्रतिनिधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर बीड शहर-ग्रामीण भागातील महिला हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित होत्या.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button