बीड जिल्ह्यात टवाळखोरावर कारवाई ! पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर.
छेडछाड,टगेगिरी करणाऱ्या होणार कठोर कारवाई.शितलकुमार बल्लाळ.

आनंद वीर( प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे अविनाश बारगळ यांनी घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्या विरोधात तसेच गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस कठोर कारवाई करण्याचे आदेश बीड पोलीस ठाणे प्रमुखांना दिले असता,वाळू,मटका, गुटखा, बनावट दारू, बिर्याणी हाऊस यासह इतर अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड शहरात तसेच जिल्ह्यात मुलींना,महिलांना छेडछाड होत असल्याची माहिती मिळाल्यावर आज दि.७ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच विविध महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, शाळा परिसरामध्ये १६ टवाळखोर तरुणांना चांगला चोप देत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.ही करावी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे उस्मान शेख, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम,पो.ह.शहेनशहा सय्यद,राहुल गुरखुदे,राहुल गोरे,अतकरे यांनी कारवाई केली. या कारवाई ने टवाळखोरांचे धाबे दणाणले असून टगेगिरी, छेडछाड करणाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांनी सांगितले.