ताज्या घडामोडी

लॉज राडा प्रकरणातील दोषींना शिक्षा हवी पण निर्दोष लोकांना त्रास नकोच !

नगरसेवकाचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक यांनच्या भेटीला.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस,लॉज राडा प्रकरणातील जमलेल्या जमावावर पोलीस प्रशासनाकडून सरसकट गुन्हे दाखल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे जे दोषी आहेत,ज्या लोकांनी पोलिसाची गाडी अडवण्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण केला फक्त त्यांच्यावरच पोलिसांनी कठोर कारवाई करावी.निर्दोष लोक व्हिडिओमध्ये दिसतात म्हणून सरसकट टाकलेले गुन्हे मागे घ्या आणि निर्दोषांना त्रास देऊ नका अशा आशयाचे निवेदन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने दिले आहे.४ ऑक्टोबर रोजी दुपारी बीडच्या हॉटेल “गोल्डन चॉईस”मध्ये दोन वेगवेगळ्या जातीचे जोडपे हॉटेलमध्ये आंबट चाळे करत आहेत अशी अफवा बीड शहरात पसरली. विशेष म्हणजे हॉटेल गोल्डन चॉईस च्या थोड्याच अंतरावर असलेल्या अमान लॉन्स मध्ये लग्न असल्याने गर्दी होती,तसेच जवळ असलेल्या मस्जिदीमध्ये शुक्रवारची नमाज संपल्यानंतर लोकांना माहिती कळताच अचानकपणे हॉटेल गोल्डन चॉईस समोर बघ्यांची गर्दी जमा झाली.पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन मध्ये बसवले पण जमलेल्या जमाव मधल्या काही टवाळखोरांनी आरडाओरडा करत पोलिसांच्या गाडीतून जोडप्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि टवाळखोरांमध्ये बाचाबाची झाली.ज्या लोकांनी जाणुनबुजून प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.परंत इतर अनेकांवर कारवाई होणे चुकीचेच आहे.या भागात हॉटेलच्या दोन्ही बाजूला मंदिर असल्याने भाविक भक्त दर्शनासाठी तसेच कीर्तन,भजन ऐकण्यासाठी येत असतात तसेच अल्पवयीन मुलींना रूम देणारा हॉटेल मालक सुद्धा तेवढाच दोषी आहे. या हॉटेलमुळे स्थानिक नागरिकाला देखील नाहक त्रास सहन करावा लागतो.त्या घटने वेळी जमलेल्या जमाव मधल्या काही लोक त्याच हॉटेल मध्ये जेवणासाठी चहा पाणीसाठी आलेले होते तर काही लोक रस्त्यावर गर्दी कशासाठी जमली म्हणून थांबलेले होते म्हणून ते सी.सी.कॅमेऱ्यामध्ये आणि मोबाईल व्हिडीओ मध्ये कैद झालेले आहेत.तेच व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिस वापरत आहेत म्हणून पोलिसांना विनंती आहे की, जे दोषी असतील आम्ही त्यांची बाजू अजिबात घेणार नाहीत पण फक्त व्हिडीओ मध्ये दिसत आहेत म्हणून १५० ते २०० लोकांवर कारवाई करत असेल तर ते चुकीचेच आहेत आणि ते थांबवावे.कारण त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली असून काही तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत तर काही लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. यामुळे फक्त व्हिडिओमध्ये दिसत असल्याने त्रास देऊन गुन्हे दाखल करू नये कारण त्यांचे आयुष्य उध्वस्त होवू नये यासाठी न.प.माजी सभापती तथा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ साहेबांकडे केली आहे. यावेळी नगरसेवक मुखील लाला, नगरसेवक लक्ष्मण विटकर,संपादक पठाण अय्युब खान, नगरसेवक शेख मतीन, जावेद, सय्यद हादी, मुहम्मद शाहनवाज आदींची उपस्थिती होती.

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button