ताज्या घडामोडी
बीड शहरातील अल्पवयीन मुलीस दोघांनी पळवले !
आठ दिवसापासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंब चिंतेत.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड,बार्शी नाका भागातून एका अल्पवयीन मुलीला शेजारीच राहत असलेल्या दोघांनी पळूउन निल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.दिनांक ३० सप्टेंबर रोजी मुलगी शाळेत आली नसल्याने मुलीच्या वडिलांना विचारणा केली असताना मुलीच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली असता मुलगी आढळून न आल्याने शेजारी राहणाऱ्या दोघांनी मुलीला फुस लावून पळवून नेल्याची माहिती मिळाली.त्यावर पेठ बीड पोलिसांनी तपास केला असता शेजारी राहणाऱ्या दोघांनी मुलीला ऑटो रिक्षात बसूऊन बीड बस स्थानकाकडे घेऊन जात असतानाचा व्हिडिओ मध्ये दिसत आहे.आठ दिवसा पासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंब,नातेवाईक चिंतेत असून पेठ बीड पोलिसांनी तत्काळ मुलीचा शोध लावावा म्हणून मुलीच्या वडिलांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पो.ह.शिंदे करत आहेत.