खंडेश्वरी यात्रेत मुल,महिला,नागरिकांच्या जीवाशी खेळ !
यात्रेत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर?

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरा जवळ असलेल्या माता खंडेश्वरी मंदिराच्या बाजूला अनेक वर्षापासून यात्रा भरत असल्याने बाहेर जिल्ह्यातील मनोरंजनासाठी,खेळणीसाठी येणारे साहित्यची योग्य तपासणी तसेच अपघात झाल्यास प्रथमोपचाराची सोय करण्यात आली नसल्याचे यात्रेत येणाऱ्या मुलं महिला नागरिकाची सुरक्षाही वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.मनोरंजनाचा टॅक्स माफ असताना देखील तिकीट दर 80 ते 100 करण्यात आला आहे.तसेच अपघात झाल्यास तात्काळ उपाय, प्रथमोपचार योजना कसल्याही प्रकारच्या नाहीत.यंत्रसामग्री वाले फक्त पैसा कमावण्यात व्यस्त.बीड शहरात नवरात्र निमित्त अनेक वर्षापासून खंडेश्वरी देवी भागात यात्रा भरत असून या यंत्रसामग्रीची रीतसर परवानगी आहे का?पाळणा असेल किंवा रेल्वे असेल यातील सामानाची दुरुस्ती देखभाल केली आहे का? सदरील पेठ बीड पोलीस ठाणे, नगरपालिका, जिल्हाधिकार्यालय,यंत्र सामग्री यांची व्हाट्सअप परवा मी घेतली आहे का? हे तपासले पाहिजे.खंडेश्वरी मंदिर समोर रात पाळण्याच्या,मौत का कुवा च्या बाजूला एक विहीर पाण्याने भरलेली असून, त्या विहिरीतील पाणी उपसा केला नाही किंवा एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून विहिरीवर काही झाकण्यात आले नसल्याने या पाण्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दिवसाही विहीर दिसेल पण रात्री विहीर न दिसल्याने यात बालक तसेच नागरिक यात पडण्याची शक्यता आहे.या मनोरंजनाचे साहित्याचे दर यावर्षी तर गगनचुंबी झाले त्यामुळे नागरिकांची लूट होत असल्याचे बोलले जात आहे. मनोरंजना वरचा टॅक्स माफ असताना देखील 80 ते 100 रुपये घेतले जात असल्याने हौसेने येणाऱ्या नागरिकांचा हीरमोड होत आहे.महावितरण कोण घेण्यात आलेली व्यक्ती पुरवठा या यंत्रसामग्री वाक्याने त्याची परवानगी घेतली आहे?कातसेच काय दुर्घटना अपघात झाला तर रुग्णवाहिकेची सुविधा नाही.दुर्दैवाने आग लागली तर अगं रोधक यंत्र देखील कुठे दिसले नाही. किंवा अचानक आग लागली तर बुजवण्यासाठी अग्निशामक ची वाहन देखील दिसते नसल्याने. हे यंत्र सामुग्रीवाले फक्त पैसे कमावण्यातच व्यस्त आहेत का? त्यांनी नागरिकांच्या जीवाशी मांडलेला खेळ याची चौकशी करावी व सामग्री वाल्यावर रीतसर चौकशी व्हावी.