ताज्या घडामोडी

शिवसैनिकांनो बीड विधानसभेची जागा जिंकायची असेल तर कामाला लागा !डॉ.श्रीकांत शिंदे.

मी घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे. अनिलदादा जगताप..

 

 

 

आनंद वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातील जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करत लोककल्याणकारी योजना अमलात आणत आहेत त्यामुळे या योजनाचा लाभ घराघरात पोहचवा. मुख्यमंत्री शिंदे साहेबांची कुशल कार्यप्रणाली सामान्य जनतेपुढे मांडा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का आहेच. मात्र आपल्याला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रावर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी मोठ्या ताकदीने काम करावे लागेल. बीड विधानसभेची जागा जिंकायची असेल तर शिवसैनीकांनो कामाला लागा, वेळ कमी राहिलेला आहे. बीड मतदार संघात जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप हे जोमाने काम करत असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे आवाहन करत अनिलदादा जगताप,सचिन मुळूक यांनी बीड मतदार संघात विकास कामाबाबत आमच्यासमोर यादी दिलेली आहे. येत्या काही दिवसात ती कामे आम्ही पूर्ण करू असे डॉ श्रीकांतजी शिंदे साहेबांनी शिवसैनिकांना अश्वस्त केले.  बीड विधानसभेच्या तोंडावर काल दि. 8 ऑक्टोबर रोजी दु 3.00 वाजताच्या दरम्यान बीड नगरीत शिवसेना नेते संसदरत्न खासदार मा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा जनसंवाद दौरा मेळावा संपन्न झाला. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांशी मुक्त संवाद साधल्याने बीड शिवसैनकांच्या अंगी नवीन ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आले. याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, बाप्पूसाहेब मोरे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी- लोकप्रतिनिधी, महिला-भगिनी, शिवसैनिक आणि पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बीड मतदारसंघांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांचा झंजावात सुरू झालेला दिसून येत आहे हा झंझावात विधानसभेच्या सभागृहात पोहोचविण्याकरिता आपल्या सर्वांना मोठ्या ताकदीने कामाला लागले पाहिजे. याबरोबरच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी देखील सर्व शिवसैनिकांना शिवधनुष्य उचलण्याची गरज असून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आपले योगदान देणे अत्यावश्यक आहे. असे शिवसेना उप नेते तथा मराठवाडा संपर्क नेते अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले. खूप दिवसांपासून अन्याय सहन करतोय. प्रत्येकवेळी मला थांबवण्यात आले व माझा पाय ओढण्यात आला. मात्र आता मी आता घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे. बीड मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्त्याला मोठं करण्यची, त्यांना ताकद देण्याची दानत मुख्यमंत्री शिंदे साहेबांमध्ये आहे व शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विश्वास आणि पाठबळ माझ्यासोबत आहे म्हणून मला यावेळी कसलीच चिंता राहिली नाही. शिवसैनिकांनो, अफवांवर विश्वास ठेऊ नका बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आशीर्वाद आणि डॉ श्रीकांतजी शिंदे साहेबांचे सहकार्य आपल्यासोबत आहेत त्यामुळे आपला विजय पक्का आहेच आता तुम्ही कामाला लागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी बीड विधानसभा जन संवाद दौरा मेळाव्यात केले.अनेक वर्ष सत्ता भोगून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागर विरोधात बीडकर आता क्षीरसागर मुक्तीचा नारा देऊ लागले आहे त्यामुळे लबाड क्षीरसागरांना धडा शिकवण्यासाठी आणि या बीड मतदार संघाचा विकास करण्याकरिता अनिल दादा जगताप यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही व सध्या बीड मतदारसंघात सर्वोपरी अनिल दादा जगताप यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे बीड मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा अनिल दादा जगताप यांच्या माध्यमातून फडकविल्या जाईल अशी भावना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button