
आनंद वीर(प्रतिनीधी) महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”ही योजना सुरू करण्यात आली असली तरी काही लाडक्या बहिणींना पैसे मिळवण्यासाठी अनंत अडचणीच सामना करावा लागत आहे.लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले त्यांच्या बँक खात्याची केवायसी केली आहे का? आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे का?असे विविध कारणे सांगून बँक लाडक्या बहिणींची अडवणूक करत असल्याच्या दिसत आहे. लाडक्या बहिणीला पहिला हप्ता जरी मिळाला असला तरी काही महिलांचे अर्ज सक्सेस झाले असले तरी,काहीना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी महिलांनी केले आहेत. आचारसंहिता काही दिवसात येऊन ठेपल्याने लाडक्या बहिणींना भीती आहे की या मुलीचे पैसे आपल्याला मिळतील की नाही? बँकेसमोर सकाळपासूनच गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.गेल्या आठ दिवसापासून बँकेत चकरा मारत,गर्दी होत असल्याने महिला संताप व्यक्त करत आहेत. बीड जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्याची बैठक घेऊन बँक खाते संबंधित अडचणी तात्काळ दूर कराव्यात असल्या सूचना द्याव्यात अशी मागणी बीड शहरातील लाडक्या बहिणीने केली आहे.