ताज्या घडामोडी

उद्योग जगतातील कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड !

एक दिवसीय दुखवटा.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती पद्वविभूषण रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने दि.९ ऑक्टोबर बुधवार रोजी मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजन होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.रतन टाटा त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना वयाच्या २१ व्या वर्षी १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले.चेअरमन झाल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात ‘लिस्टेड’ झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.निष्ठा,समाजाच्या प्रगतीची तळमळ आणि गरजूंना मदतीसाठी कायमच पुढे येणारा हात अशी ओळख असलेल्या रतन टाटा यांचे निधन अतिशय क्लेशकारक आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे ते पणतू. १९९० ते २०१२ अशी २२ वर्ष ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रतन टाटा यांनी अनेक वर्षे समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचेही प्रमुख होते. त्यांच्या निधनामुळे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, उद्योजकतातील कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेले आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एकदिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, या काळात राज्यातील शासकीय कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणकीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यांच्यावर शासकीय इतममात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button