
वीर(प्रतिनिधी) नवरात्र देवी उत्सव बीड शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी माता खंडेश्वरी भागात यात्रा भरत असल्याने बीड शहरातील तसेच बीड तालुक्यातील भाविक भक्त,नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावतात.तसेच सायंकाळी मनोरंजनासाठी, खेळणीसाठी गगनचुंबी रहाट पाळणे लावण्यात आले आहेत.त्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा होतात. परंतु दुचाकी,चार चाकी लावण्यासाठी काही लोक पार्किंगच्या नावाखाली अक्षरशा लुटत असल्याचे दिसत आहे. पार्किंग लावलेली वाहने खरंच सुरक्षित आहेत का? दुचाकी चोरी गेल्यास पार्किंग घेणारा जबाबदार आहे का? रात्री अंधाराचा फायदा घेत काही लोक, पार्किंगवालेच नागरिकाच्या दुचाकी मधील पेट्रोल काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.जे भक्त नागरिक पार्किंग देत नाहीत त्यांना अरेरवीची भाषा करून दुचाकी चार चाकी लावण्यास मज्जाव करतात, ज्या ठिकाणी पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे त्या पावतिची नगरपालिका मध्ये नोंद करण्यात आली आहे का? ते तपासावे, रहाट पाळण्याचे दर अव्वाच्या सव्वा केल्याने भक्तात,नागरिकात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे यंत्रसामग्री, पार्किंग च्या नावाखाली भक्तांची देवीच्या दारातच लूट करत असल्याचे बोलले जात आहे.तरी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.