बुद्धभुमी बचाव आंदोलन समर्थनार्थ लिंबागणेश येथे रास्तारोको.
जगाला युद्ध नको बुद्ध हवा.

आनंद वीर(प्रतिनिधी)- (दि.१० )मराठवाड्यातील बौद्धांचे श्रद्धास्थळ म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील बुद्ध लेखणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना विहार,मेडिटेशन सेंटरला अतिक्रमण समजुन नोटीस बजावण्यात आली असुन यामुळे बौद्ध समाजाच्या भावना जाणिवपूर्वक दुखावण्याचे षडयंत्र असुन याच्या निषेधार्थ आणि बीड येथील नियोजित रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव द्यावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे समितीच्या वतीने दि.०९ बुधवार रोजी आयोजित मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१०. वार गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान शिवतीर्थ लिंबागणेश येथे ” बुद्ध भुमी बचाव आंदोलन” समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “युद्ध नको बुद्ध हवा ” ” बौद्ध भुमी आमच्या हक्काची” आदि घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच बाळासाहेब मोरे पाटील, ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे यांची समायोजित भाषणे झाली.आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव,राजेभाऊ गिरे, विक्रांत वाणी, अशोक जाधव,संतोष वाणी,बाळकृष्ण थोरात ,सुरेश निर्मळ,रेवण येडे,बबलु थोरात,विशाल सोनावणे, आनंद येडे, विशाल येडे, सुर्यकांत ठोकळ, अनिल शेलार आरूण निर्मळ, जितु निर्मळ, रोहित सोनावणे, दिनेश जाधव,शंकर निर्मळ, अमोल वक्ते, पप्पू निर्मळ, आदी आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.निवेदन नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,लिंबागणेश पोलिस चौकीचे अंमलदार बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंढे, संतोष राऊत , रामहरी शिंदे,तलाठी गणपत पोतदार यांना देण्यात आले.बुद्ध लेखणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना विहार,मेडिटेशन सेंटरला अतिक्रमण घोषित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करा.मराठवाड्यातील बौद्धांचे श्रद्धास्थळ म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील बुद्ध लेखणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार,मेडिटेशन सेंटरला गेल्या ६०- ७० वर्षांपासून दरवर्षी जवळपास १० लाख उपासक,उपासिका तसेच अभ्यासक,पर्यटक भेट देतात.मात्र या श्रद्धास्थळाला अतिक्रमण समजुन नोटीस बजावण्यात आली असुन यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली असून यामुळे बौद्ध समाजाच्या भावना जाणिवपूर्वक दुखावण्याचे षडयंत्र असुन मुळातच हजारो वर्षांपासून बौद्ध लेणी अस्तित्वात असताना त्यांच्या पायथ्याची जागा विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित होत असताना कोणतीही शहानिशा न करता बौद्धांच्या ऐतिहासिक स्थळाला हटविण्याचा मनुवादी सरकारचा डाव असुन हाणुन पाडण्यासाठी बौद्ध लेणी बचाव,बुद्धभुमी बचाव म्हणत अस्मितेचा लढा लढण्यासाठी आणि शासनाच्या निषेधार्थ संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधांसाठी ५० एक्कर जागा द्यावी. बुद्धिष्ट सर्किट मध्ये या वास्तुचा समावेश करावा, पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करावा, अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाशयोजना करावी,लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी,अजिंठा लेणी मार्गावरील हर्सुल टी पाँइंट येथे भव्य बुद्ध मूर्ती बसविण्यात यावी.आजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पुर्ण करावे.
राज्यपालांच्या नावाचा वापर करून आंबेडकरी समुदायाचा नियोजित मोर्चाला परवानगी नाकरणे निषेधार्ह :- डॉ.गणेश ढवळे
बीड येथील नियोजित रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव द्यावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे समिती व आंबेडकरी जनतेकडून काल दि.०९.१०.२०२४ वार बुधवार रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील समाज बांधव बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले होते.यावेळी पोलिसांनी मोर्चा काढण्यास राज्यपालांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत परवानगी नाकारली. राज्यपालांचा दौरा केवळ २ तास होता त्यामुळे पोलिस प्रशासनाने काही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत याबद्दल आंबेडकर अनुयायांनी नाराजी व्यक्त केली याचा डॉ . गणेश ढवळे यांनी तिव्र निषेध व्यक्त केला.