ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांची अडवणूक थांबवावी:अनिल दादा जगताप.
कर्मचारी,अधिकारी अडवूनक करत असेल तर संपर्क करावा.

आनंद वीर(प्रतिनिधी) मजुर,कामगारांना विविध योजनेचा लाभ मिळवा म्हणून शासनाने कामगार योजना सुरू केली होती.शासन परिपत्रकानुसार ग्रामिण भागाकरिता ग्रामसेवक यांना बांधकाम कामगारांचा 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रधिकृत म्हणून नेमले आहेत. परंतू सबंधित ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांची अडवणूक होत असून आम्हाला वरुन आदेश नाहीत, असे सांगून बांधकाम कामगारांची बोळवण केली जात आहे. बांधकाम कामगारांचे हेलपाटे बंद व्हावेत तसेच ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी लागणारी सही व शिक्का देण्या बाबतचे योग्य ते मार्गदर्शन करून कामगारांचा होणारा मानसिक त्रास थांबवावा अशा सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना जिल्हा शाखा, बीड ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांची अडवणूक होत असल्यामुळे त्रस्त आहे. यामुळे या संघटनेने संगितादेवी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लागलीच कार्यवाही करत पंचायत समिती अधिकारी सर्व यांना पत्रक काढून ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांची अडवणूक थांबवावी व ग्रामसेवकांकडून काम होत नसल्यास त्या ठिकाणी अन्य कुणाची नियुक्ती करावे अशा सूचना केल्या आहेत. मात्र अद्याप पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी कुठलीच कार्यवाही केली नसल्याने बांधकाम कामगारांनी अनिलदादा जगताप यांच्यासमोर आपल्या अडचणींचा टाहो टाहो फोडला. या सर्व अडचणी लक्षात अनिलदादा जगताप यांनी पत्रक जाहीर करून पंचायत समिती अधिकारी सर्व यांना सूचना केल्या आहेत की, बीड जिल्हयातील ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांची अडवणूक तात्काळ थांबवा. अन्यथा शिवसेना पंचायत समितीमध्ये बांधकाम कामगारांच्या अडचणी सोडविण्याकरिता येईल व तिथून पुढे होणाऱ्या परिणामांना आम्ही जिम्मेदार नसतोल.