ताज्या घडामोडी
बीड शहरातील रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप
बीड नगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून,समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.मागील दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती परंतु दि.12 ऑक्टोबर दुपारी अचानक संतधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.अर्धा तास पाऊस पडल्याने शहरातील काही भागात तळ्याचे स्वरूप आले. काही भागात तर गटारातील पाणी सुद्धा रस्त्यावर होऊ लागले, रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग शोधावा लागला,त्यामुळे बीड नगरपालिकेचां ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.पावसाळयापूर्वी चे काम,नियोजन,नाले, गटार साफसफाई झाली नसल्याने बीड शहरातील शाहूनगर, धांडे नगर, सोमेश्वर नगर,जालना रोड पाण्याखाली गेल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते.