
आनंद वीर( प्रतिनिधी)गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचामुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण करून आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.दरम्यान दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नगद नारायण गडावर जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेतला. यावेळी दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.उलथापालथ करावी लागणार : मनोज जरांगे पाटील म्हणाले,“मी नारायणगडावर मर्यादा पाळणार आहे. आमच्या वाट्याला अन्याय आला आहे. अन्यायाविरोधात उठाव करावा लागणार. हा जनसमुदाय अन्यायाविरोधात आला आहे. कुणीही जहारगीदाराची औलाद आली तरी झुकायचं नाही. अन्याय होत असेल, तर स्वसंरक्षण करायला शिका. समाज वाचवा, लेकर वाचवा. समाजाची मान उंचावेल असं वागा. आपल्याला विनाकारण टार्गेट केलं जात आहे. मला तुमची मुलं अधिकारी झालेलं पाहायचंय. जर आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आपल्याला यावेळीस उलथापालथ करावी लागणार. याशिवाय आपल्याकडे आता पर्याय नाही. काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आल्याने काही दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने, आचारसंहिते पूर्वीच मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून सरकार आपल्या नाकावर टिचून जर कुठला निर्णय होणार असतील तर आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी आपल्याला लढावंच लागणार. आपल्याला आपला समुदाय आणि शेतकरी महत्वाच’ मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे. राज्यातील ज अन्याय झाला आणि मी सांगितलं आपल्याला हेच करायचंतर तेच करा, हेचं वचन मला तुमच्याकडून हवंय.”