राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या !
Y दर्जाची सुरक्षा असताना देखील हत्या.

वीर(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबई वांद्रे,पूर्व खैर नगर भागात आमदार झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला.गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते परंतु,उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.पंधरा दिवसापूर्वी बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर त्यांना Y दर्जाचे सुरक्षा देण्यात आली होती.परंतु दि.12 ऑक्टोबर रोजी 9:30 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या फायर केल्याची माहिती मिळली आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक हरियाणा व एक उत्तर प्रदेश मधला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिसऱ्या फराला आरोग्याच्या शोध पोलीस घेत आहेत.बाबा सिद्दिकी हे काँग्रेसचे नेते सलग तीन वेळा आमदार देखील होते शिवाय त्यांनी मंत्री पद भूषविले होते.सद्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटात होते.