छत्तीसगडच्या कामगारांना बीडमध्ये डांबून मारहाण !
सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी केली त्या कामगारांची सुटका

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरात विविध व्यवसाय करण्यासाठी बाहेर राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात बीड मध्ये आले आहेत. विविध हॉटेल लॉज, बेकरी व्यवसाय,फरसाण कारखाना, पेढा,चिक्की तसेच एमआयडीसी मधील विविध काम करण्यासाठी बाहेर राज्यातील कामगार आहेत. त्या कामगाराची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात करण्यात येत नसल्याने एखादा गुन्हा करून गेलेला कामगाराचा शोध लागत नाही. छत्तीसगड येथील चार कामगारांना २३ दिवसापूर्वी कपडा कंपनीत कामाला लावतो म्हणून ओडिशाच्या एंजटने संभाजीनगर येथे आणून बीड येथील बोअरवेल चालकाच्या ताब्यात देत बोअरवेल चालकाकडून त्या बदल्यात ८० हजार रुपये घेतले.परंतु त्या कामगारांना बोअरवेलचे काम येत नसल्याने त्यांनी बीडमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बीड शहरातील नवा मोंढा रोडवरील एका खोलीत डांबण्यात येवून त्यांचे मोबाईल हिसकावून घेण्यात आले.बोअरवेलच्या मॅनेजरने केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले.दरम्यान बीड येथील सामाजिक कार्यकर्त्यांते तत्त्वशील कांबळे यांना या कामगाराची माहिती मिळताच त्यांनी चारही कामगारांची चौकशी केली.मारहाण झालेल्या कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दिनेश सियाराम मंडावी (२०), सोनुसोनलाल मंडावी (१६), गिरवर सारद मराई (३६), धिरेंद्र पुजारी (२१ रा.मु.पो.सालनाता. विश्रामपूर जी. कोंढागांव छत्तीसगढ) चारकामगारांना २३ दिवसापूर्वी कंपनीत कामकरण्यासाठी संधी असल्याची थाप मारूनशिवराम नावाच्या एजंटाने संभाजीनगर येथेविशाल खाडे (रा. नांदुरघाट ता. केज) याव्यक्तीच्या हवाली करत एजंट निघून गेलाहोता. त्यांनंतर चौघांना एका बोअरवेलच्या गाडीवर कामास ठेवण्यात आले. याबाबत त्या एजंट विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्याचा तहसील कांबळे यांनी दिली.