नवा मेळावा सुरू झाला तरी या मेळाव्याचे पावित्र्य कमी होणार नाही!धनंजय मुंडे
भगवानगडावर उसळला जनसागर.

विर(प्रर्तीनिधी)भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा शनिवारी भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा परंपरेनुसार पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते त्यांनी या मेळाव्याद्वारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांनी नारायण गडावर घेतलेल्या मेळाव्यावर निशाणा साधला. पंकजा यांच्या मेळाव्याला आलेला विविध जातीधर्मांचा समुदाय एकसंध झाला तर कितीही नवे मेळावे सुरू झाले तरी या पवित्र दसरा मेळाव्याचे पावित्र्य कुणालाही संपवता येणार नाही, असे ते म्हणालेत.धनंजय मुंडे म्हणाले, आज मला व पंकजा मुंडे यांना जेवढा आनंद होत आहे, त्याहून अधिक आनंद मला तुमच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे.इथे आलेला समुदाय आणि बघत असणारा समुदाय हे सर्वजण एकजूट झाले तर कितीही नवे मेळावे सुरू झाले तरी कुणालाही या पवित्र दसरा मेळाव्याचे पावित्र्य संपवता येणार नाही. एवढी मोठी ताकद पंकजा मुंडेंमध्ये आहे.मी आज 12 वर्षांच्या तपानंतर या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माझ्या बहिणीच्या व परंपरेच्या पाठिशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहे. पंकजा यांनी अनेक संघर्षांतून हा मेळावा केला. मी त्यांचे आभार मानतो. अभिनंदन करतो. त्या कोणत्याही संकटाला घाबरल्या नाहीत. सोबत कोण आहे? कोण नाही? हे ही त्यांनी पाहिले नाही. त्यांनी केवळ त्यांच्या समोर असणाऱ्या मायबाप जनतेकडे पाहिले. प्रसंगी त्या माझ्याविरोधातही लढल्या. पण मागे हटल्या नाही. ही ताकद पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे. आमच्या नशिबात संघर्ष आहे. तुमच्या सर्वांच्या नशिबातही संघर्ष आहे.अशा संघर्षाच्या काळात आपण एकजूट आहोत हेच ही अभूतपूर्व गर्दी सांगत आहे.धनंजय मुंडे म्हणाले, या राज्यात जेवढे महापुरुष, महंत, संत होऊन गेले, त्यांनी कोणत्याही एका जाती-धर्मासाठी काम केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे करण्यासाठी अठरा पगड जातींची मोट बांधली. त्यांचे राज्य एका जातीचे नव्हते. संत भगवान बाबा यांनी आम्हाला अध्यात्म शिकवले. ते ही कोणत्या एका जातीसाठी नव्हते. ते सर्वांसाठी होते. त्यामुळेच या दसरा मेळाव्याला आज सर्वच जातीधर्माचे लोक आलेत. तुम लाख कोशिश करो, हमे हराने की…धनंजय मुंडे यांनी यावेळी एका हिंदी शायरीचा उल्लेख करत भविष्यातील आपल्या रणनीतीचेही संकेत दिले. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नसते. पण त्यानंतरही एक सांगतो. आम्हाला हरवण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी आम्ही त्याच दुप्पट वेगाने पुन्हा उजळून निघू,असे ते त्याच दुप्पट वेगाने पुन्हा उजळून निघू, असे ते म्हणाले. यासंबंधी त्यांनी ‘तुम लाख कोशिश करो, हमेहरानेकी,हमजबजबबिखरेंगे,दुगनीरफ्तार से निखरेंगे’ हा शेर उपस्थितांना म्हणून दाखवला.