बाजीराव चव्हाण विधानसभेच्या मैदानात ! उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन.
युवाशक्ती हजारोच्या बाईक रॅलीने ताकत दाखवणार.

आनंद वीर बीड प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यतत्परतेला प्रेरित होऊन आज महाराष्ट्रातील तळागाळातील युवावर्ग लाखोच्या संख्येने युवा सेनेसोबत उभे राहत आहेत. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक, आरोग्य दूत बाजीराव दादा चव्हाण, हे तळागाळातील युवा सैनिकांना आपल्या सोबत घेऊन महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाडा पिंजून काढत आहे. व युवा सेना अजून मजबूत करण्यासाठी राज्यासह मराठवाडा दौरा करत आहेत. याचेच औचित्य साधून दिनांक १४/१०/२०२४ रोजी वार सोमवार वेळ ठिक १२ : ३० वाजता आशिर्वाद लाॅन्स, बार्शी रोड बीड येथे होणार आहे. युवासेनेचे राज्य कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक हे या कार्यक्रमात आपली हजेरी लावणार आहेत. या महत्वपूर्ण कार्यक्रमात ते उद्या बीडमध्ये येत असून ते उद्या बीड जिल्ह्यातील तमाम युवा सैनिकांना आपले मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबत आरोग्य दूत बाजीराव चव्हाण आपल्या हजारो युवासैनिक, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शेकडो पदाधिकारी, व बीड जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक व त्यांचे खंदे समर्थक, कार्यकर्ते यांच्यासह आपली युवाशक्तीची ताकद दाखवून देणार आहेत. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा दौरा बीड साठी महत्वपूर्ण माणला जात आहे. या कार्यक्रमात आरोग्य दूत बाजीराव दादा चव्हाण यांची बीडची उमेदवारी व त्यांना येणाऱ्या विधासभेसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याचेही बीड जिल्ह्यात चर्चा जोरदार होत आहे. त्यामुळे बाजीराव चव्हाण आपल्या पाठीशी हजारोंच्या संख्येने युवाशक्तीची असलेली ताकत दाखवुन देतील अशी सध्या चर्चा आहे. पूर्वेस सरनाईक हे संभाजीनगर बीड शहरात आगमन होताच, जालना रोडवरील महालक्ष्मी चौका मध्ये त्यांचे जोरदार स्वागत होऊन 700 ते 800 दुचाकी, 200 चारचाकी, आरोग्य रथ असणार आहे. महालक्ष्मी चौक ते आशीर्वाद लॉन्स पर्यंत दुचाकी रॅली निघणार असून यात हजारोचे संख्येने युवक सामील होणार आहेत. त्यामुळे उद्याच्या या अभुतपुर्व कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील युवाशक्तीने लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा सेनेचे युवा सेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, व युवा सेना बीड जिल्हा प्रमुख सुमित कोळपे, युवा सेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे यांनी केले आहे.