उपोषणकर्ते माजीसैनिक वीर यांची तब्येत खालवली
बीड रेल्वे स्थानकाला डॉ.आंबेडकरांचे नाव द्या नाही तर माझा जीव घ्या...वीर

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरात उभारण्यात आलेल्या बीड रेल्वे स्थानकाला आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामांकन केले होते. पोलीस प्रशासनाने राजकीय दवाबापोटी बॅनर हटवून बॅनर लावणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.या विरोधात समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. देशाला राज्यघटना देणाऱ्या महामानवाचे नाव बीड रेल्वे स्थानकाला देण्यात आले मात्र या विरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.डॉ. आंबेडकरांचे नाव कायम करावे यासाठी पाली येथील माजी सैनिक अनुरथ वीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.वीर यांची प्रकृती खालावली असून स्थानिक प्रशासनाकडून याची दखल न घेतल्यामुळे आंबेडकरी जनतेमधून तीव्र ना पसंती पसरली आहे.बीड येथील रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ तेथील बॅनर हटवले या विरोधात आंबेडकरी अनुयांया मधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. प्रशासनाच्या धोरणाविरोधात बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .मात्र या मोर्चालाही पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली पोलीस यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडत आहे का? हा देखील सवाल समाज करत आहे. या विरोधात तमाम समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.बीड रेल्वे स्थानिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी माजी सैनिक अनुरथ वीर हे मागील पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे पाण्याचा एक थेंबही न घेता त्यांचे उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती खालवली असून प्रशासन जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे का? हा प्रश्न आंबेडकरी जनतेला पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्ते अनुरथ वीर यांना समाज माध्यमातून मोठा पाठिंबा मिळत आहे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन अनुरथ वीर यांची मागणी मान्य करून उपोषण सोडवावे नसता आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमातुन येत आहेत.जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषणास बसलेल्या वीर यांच्या समर्थनार्थ आंबेडकरी जनतेतून बीड प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अनुरथ वीर हे डॉ. आंबेडकरांचे नाव दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले, ही लढाई आर पारची असून ” बीड रेल्वे स्थानकाला डॉ. आंबेडकराचे नाव द्या नाही तर माझा जीव घ्या” असे अनुरूप वीर यांनी बोलून दाखवले.