मोंढा रोडवरील रस्त्या कामास दलित वस्ती योजनेचा बोर्ड लावावा.सनी वाघमारे
न.प.मुख्याधिकारी,ठेकेदार यांना अण्णाभाऊंच्या नावाचे वावडे आहे का?

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील विविध प्रभागामध्ये रस्ते नाल्याचे काम सुरू आहेत.ज्या योजनेतून निधी मंजूर झालेला आहे त्या योजनेचे नाव त्या ठिकाणी, रस्त्यावर लावणे बंधनकारक असून देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नाव प्रभाग क्रः- 2 (SC राखीव) मोंढा रोड गेल्या अनेक वर्षापासून सदरील रस्ताची अवस्था अत्यंत वाईट परस्थिती झाली होती.मोंढा रोड हा कृषी उत्पन्न बाजार समिती ,एम.आय.डि.सी, खंडेश्वरी मंदिर देवस्थान अनेक ठिकाणी हा रस्ता जोडला आहे.बीड जिल्हा प्रशासनाने लोकाच्या हिताच्या प्रश्न सोडवून या संकटातून मुक्त केले.याबाबत मी बीड जिल्हा प्रशासनाची नागरिकांनी मनःपुर्वक आभार व्यक्त केले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार सन २०२४-२५ योजनेतून प्रभाग क्रः- 2 (SC राखीव) मोंढा रोड शिव-शारदा बिल्डिंग ते जिजामाता चौक ते संत सावतामाळी चौक ते अमरधाम स्मशानभूमी पर्यंत रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी २० लाख रुपये निधी देण्यात आला सदरील काम हे समर्थ कन्ट्रक्शनचे ठेकेदार पाठक नामक व्यक्तीला देण्यात आला,परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना नावाचा बोर्ड लावण्यास बीड नगर परिषदचे मुख्यधिकारी व बांधकांम अभियंता यांना का विसर पडला आहे का? जाणीवपुर्वक नावाचा बोर्ड टाळण्यात आला ?तसेच महामानव महापुरुषांचे नावाचे वावडे आहे का? असा प्रश्नन आंबेडकर जनतेला पडला आहे.या ठिकाणी बीड नगरपालिका मुख्यधिकारी,बांधकांम अभियंता व पाठक नामक ठेकेदार यांनी जाणीवपूर्वक महापुरुषाचे नावाचा बोर्ड न लावल्यााने आंबेडकरी जनतेच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.या मागील काही हेतू असेल तो मी याठिकाणी साध्य होऊ देणार नाही.असे देखील वाघमारे यांनी सांगितले आहे मुख्यधिकारी,बांधकांम अभियंता या प्रकाराला खतपाणी घालत तर नाहीत ना ? मी या प्रसिध्दातून माध्यमातून संबंधित अधिकारी व ठेकेदारास सवाल केला आहे.त्या कंट्रक्शने दोन दिवसात तीन ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने नावाचा बोर्ड लावण्यात यावा.अन्यथा मी बीड नगर परिषद कार्यालय येथे आंदोलन करणार असा इशारा सनी वाघमारे यांनी दिला आहे.