ताज्या घडामोडी
खजाना विहीर जवळ कंटेनर पलटला
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कंटेनर पलटला, सुदैवाने जीवितहानी टळली.

आनंद वीर (प्रतिनीधी) धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आहेर वडगाव फाटा, प्रसिद्ध असलेली खजाना विहीर जवळ आज दि.१४. सोमवार रोजी पहाटे ६ वाजता कन्याकुमारी वरून राजस्थान कडे कपडा घेऊन जाणारा कंटेनर (वाहन क्रमांक RJ19 GH 1937 ) पलटला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरच आडवा झाला, यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.वाहनचालक किरकोळ जखमी झाला असुन सुदैवाने जिवितहानी नाही. बीड ग्रामीण पोलिसांना या अपघाताची माहिती करताच ट्रक बाजूला घेण्याचे काम केले.