
वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची नगर परिषद असून आज आचारसंहिता होणार लागू होण्याची शक्यता आहे.राज्यातील जनतेला निवड विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या विधानसभा निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची घोषणा आज निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे करणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.महाराष्ट्रातील आणि झारखंड राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याने यापूर्वीच विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे.या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग महाराष्ट्रातील आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणारा असून तसेच या निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे पत्रकार परिषद झाल्यानंतर,निवडणुका जाहीर झाल्यावर तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहे.