ताज्या घडामोडी

ज्योतीताई मेटे विधानसभा निवडणूक लढवणार.

अनेकांची इच्छा मी निवडणूक लढवावी, शिवसंग्राम ची आढावा बैठक संपन्न.

बीड (प्रतिनिधी)आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी “परिवर्तन संकल्प यात्रा” काढली आहे. यात त्या जिल्ह्यासह बीड विधानसभा मतदार संघात जनतेशी आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेच्या अनुषंगाने त्यांनी दी. १४ ऑक्टोबर रोजी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची आढावा बैठक हॉटेल सद्‌गुरू, धामणगांव रोड, कडा घेतली. यात आष्टी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत बोलत असताना आपण शिवसंग्रामच्या वतीने निवडणूक लढावी अशी अनेकांची इच्छा आहे यावर मी योग्य तो निर्णय घेईल असे डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या.

    लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या निधननंतर देखील शिवसंग्रामचे अस्तित्व त्याच तोलाचे आहे. साहेब कायम विस्थापिता सोबत खंबीर पने उभा राहिले. त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहिले आणि त्यांना राजकीय पटलावर संधी देत राहिले. शिवसंग्राम साहेबांच्या पश्चात त्यांच्या विचाराशी कधीही तडजोड करणार नाही. काल दसरा मेळाव्याला नारायण गडावर उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले यावेळी देखील महाराष्ट्रभरातील अनेकांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर मी बीड विधानसभा निवडणूक शिवसंग्राम कडून लढावी अशीही इच्छा अनेकांनी बोलून दाखवली यावर देखील मी योग्य वेळी निर्णय घेईल परंतु आता तुम्ही जोमनी कामाला लागा त्याचबरोबर आपण या परिवर्तन संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्हा सह बीड विधानसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधणार आहोत.असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. ज्योती मेटे यांनी केले.या प्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गडाचे महंत ह भ प वाघमारे महाराज, बीड विधानसभा प्रमुख प्रा. सुभाष जाधव , जिल्हा सरचिटणीस ज्ञानदेव थोरवे,आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,शिरूर शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष माऊली शिंदे, पाटोदा शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुशील तांबे, ज्येष्ठ नेते ज्ञानेश दादा पानसंबळ, राजेंद्र माने, सुनील कुटे, आष्टी शिवसंग्रामचे नेते अशोक चौधरी, संपर्कप्रमुख राजू म्हस्के,शिवाजी म्हस्के, राजेंद्र मस्के, राहुल चौधरी,माऊली गायकवाड, मयूर चव्हाण,अरबाज सय्यद, तुकाराम काळे, बाबू धनावडे संकेत चौधरी, तुकाराम काळे, गणेश हरकर तसेच तेज वार्ता न्यूज पोर्टल चे पत्रकार इब्राहिम सय्यद शिरूर कासारचे शिवसंग्राम नेते योगेश काका जाधव, शिवाजी काका वारे, रामेश्वर पांडुळे,विजय शिंदे प्रभाकर डोंगरे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.*

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button