एस.टी.चालक,वाहक,कर्मचाऱ्यांसाठी मोफत बी.पी.शुगर, नेत्रतपासणी,चष्मे वाटप,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर!
आनील दादा मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

वीर( प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात कायम प्राधान्याने पुढाकार घेत असलेल्या रोटरी मिडटाऊन आणि अनिलदादा जगताप मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. चालक, वाहक, कर्मचाऱ्यांसाठी मोफत बी. पी., शुगर, नेत्रतपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे दिनांक १६/१०/२०२४ व १७/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० यावेळेत बस स्थानक परिसरात आयोजन करण्यात आले आहे. एस. टी. चालक, वाहक, कर्मचारी हे अहोरात्र प्रवश्यांसाठी तत्पर सेवा देत असतात, त्यामध्ये त्यांचे शरीराकडे अगदी दुर्लक्ष होत राहते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास हे ब्रीद वाक्य उराशी घेवून हे कर्मचारी काम करत असतात. मागे अशीच बातमी वाचण्यात आली की, चालकाला हृदय विकाराचा झटका आला तरी त्यांने प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवशांचा जीव वाचवला. असे प्रकार होवू नये म्हणून म्हणतात ना प्रिव्हेनशन इज बेटर द्यान क्युअर या उद्देशाने एस. टी. चालक, वाहक, कर्मचाऱ्यांसाठी मोफत बी. पी., शुगर, नेत्रतपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रोटरी मिडटाऊन व अनिल दादा जगताप मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक१६/१०/२०२४ व १७/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० यावेळेत बस स्थानक परिसरात घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये सर्व तपासण्या या चंपावती नेत्रालय येथील तज्ञ डॉक्टर व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे तज्ञ डॉक्टर करणार आहेत. यामध्ये चंपावती नेत्रालय येथील तज्ञ डॉक्टर डॉ. नारायण आळणे, डॉ. प्रदिप सानप, डॉ. रविंद्र गालफाडे व त्यांची टीम तसेच रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे तज्ञ डॉ. रो. किरण सवासे, रो. डॉ. निलेश जगदाळे हे सेवा देणार आहेत. या शिबीरामध्ये तपासणी केल्यावर मोफत नंबरचे चष्मे देण्यात येणार आहेत, तसेच बी. पी. शुगर हे देखील मोफत तपसण्यात येणार असून त्यांना त्यानुसार योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या तपासणी केलेल्या चालक वाहक व कर्मचारी यांना मोतिबिंदू चे निदान होईल अशाचे मोतिबिंदू चे ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व अनिल दादा जगताप मित्र मंडळ हे दोन्ही सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम घेत असतात यावेळी या दोन्ही सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने हा एस.टी. चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे तरी सर्व ,एस.टी. चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान दोन्ही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.