मुख्यमंत्र्याची”लाडकी बहीण योजना”म्हणजे लॉलीपॉप !करुणा मुंडे.
महिलांना पैसे देण्याऐवजी रोजगार उपलब्ध करून द्यावा.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक काही दिवसावर आली असताना बीड विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार पैकी महत्त्वाच्या असलेल्या स्वराज शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांनी गोरगरीब, कष्टकरी, मजूर, ऊसतोड कामगार यांची वेळोवेळी केलेली मदत व सहकार्यामुळे आपल्या कार्याच्या माध्यमातून बीड व परळी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.गोरगरीब महिलांना साडी वाटप, शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णांना मदत करत असल्याने करुणा मुंडे यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.तसेच बीड शहरातील रस्ते,नाली,जागोजागी कचऱ्याचे ढिगारे व शहराला 15 ते 20 दिवसाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर बीड नगर पालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.परंतु मुख्यधिकारी यांनी बीड शहराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.त्यामुळे बीड नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन तीव्र करणार असल्याचे बोलून दाखवले.बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ झाली असून त्यावर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याने छेडछाड,बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गंभीरतेने पाहून अश्या लोकांना कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे.यामुळे बीड तालुक्यातील मतदार हे मला नक्कीच निवडून देतील असा विश्वास इच्छुक उमेदवार करुणा धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची माहिती दिली.
सविस्तर मुलाखत व्हिडिओ वर उपलब्ध आहे
–