चोरटे गाईचे अपहरण कसे करतात,व्हिडिओ पहा.
बीड शहरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय बीड पोलिसांनी शोध घ्यावा.

आनंद वीर (प्रतिनीधी) बीड शहरामध्ये मागील काही महिन्यापासून मुख्य रस्ता तसेच गल्लोगल्ली मोकाट जनावर दिसून येत आहेत. मागील महिन्यातच सहयोग नगर भागामध्ये रात्री जनावरे चोरून वाहनात घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जनावरे चोरट्यांना एकाने प्रतिकार केल्यास त्याला देखील मारहाण करण्यात आली होती,त्यामुळे सोरट्याची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील नगर रोडवरील बालेपिर भागामध्ये एका वाहनात जनावरे चोरट्याने चोरूली. रात्री अपहरण होत असल्याचां व्हिडिओ समोर आला आहे.चोरट्यांनी दोन गायीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे. या गाई कत्तलखान्यात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बीड शहरातील विविध भागांमध्ये चोरांनी रात्री पाच हे सहा गायी चोरून घेऊन गेले. त्यामुळे या चोरांचा तपास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोमाता यांनी यांनी केली आहे. बीड पोलिसांनी या जनावर चोरणाऱ्या टोळीला शोधण्याचे आव्हान आहे.