
आनंद वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये गुटक्याला बंदी असताना देखील बीड- जिल्ह्यात गुटका सर्रास विक्री होत असल्याचे दिसत आहे.गुटख्याची तस्करी आणि विक्री करणाऱ्या महारुद्र उर्फ मुळे आबा अनेक महिन्यापासून फरार होते, गुटखा विक्री करत असल्याने त्याच्यावर बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे फरार होते, बीड पोलीस त्यांचा मागील काही महिन्यापासून शोध घेत होते परंतु तो पोलिसांना होणारा देत होता अखेर स.पो.नी.निबाळाराजे दराडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथून आबा मुळेला अटक करण्यात आले.दिंद्रुड आणि (Beedpolice) बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महारुद्र उर्फमुळे आबावर गुटखा (Gutkha) प्रकरणात गुन्हे दाखल होते. औरंगाबाद येथील गुटखा विकणाऱ्या एका तरुणाला मुळे आबा याने बीडमध्ये आले असता मारहाण केली होती, हा त्यामधील मुख्य आरोपी मुळे आबा मागच्या अनेक महिन्यापासून तो फरार असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. दिंदृड मध्ये पोलिसांनी पकडलेले गुटखा ७० लाख तर बीडग्रामीण पोलिसांनी ३० लाखांचा गुटखा ताब्यातघेतला होता.अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपीअसलेल्या मुळे आबाला अंबडच्या बसस्थानकातून ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे,स्थानिक गुन्हे शाखा बीड उस्मान शेख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे स.पो.नि.बाळाराजे दराडे,पो.ना.मुंडे,पो.ना. lनामदेव सानप,पो.ना.,मोहसीन,पो. शि.निर्धार यांनी ही कारवाई केली.