मी विधानसभा निवडणूक लढवणार व जिंकणार.अनिल दादा जगताप
सच्चा शिवसैनिक आजही माझ्यासोबतच.

वीर(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसावर आली असल्याने सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यानी विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे असा ठाम विश्वासाने सांगत आहेत. बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख(शिंदे गट) अनिल दादा जगताप हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचां ठाम निर्धार केला असून तशी त्यांनी तयारी देखील केली आहे. याआधी पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याचे सांगून आता नक्कीच न्याय मिळणार त्याचे सांगितले. बीड जिल्ह्यामध्ये 25 हजाराच्या वर दुबारा मतदार नोंदणी असल्याचे पुराव्यानिशी सांगितले.ते रद्द करावे म्हणून मी पाठपुरावा करत आहे.आतापर्यंत पक्षाचा मान सन्मान ठेवला, पक्ष जो निर्णय सांगेल तो निर्णय मी मान्य केला परंतु त्यालाही काही मर्यादा असतात, त्यामुळे आता माझे कार्यकर्ते,शिवसैनिक जे सांगतील तेच मी ऐकणार आहे. गेल्या आठवड्यातच डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मेळावा बीडला झाला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, बीडची जागा शिवसेनाला सुटणार असून कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन रात्रंदिवस शिवसेनेचा आमदार करण्यासाठी काम करावे. त्यामुळे बीड तालुक्यातील शिवसैनिक कामाला लागली पक्ष मलाच उमेदवारी देणार व मीच विश्वासाने दादा जगताप यांनी बोलून दाखवला.